जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत अक्राणी तालुक्यातील ग्रामपंचायत सोन बू. अधिकारी अशोक पावरा गुणवंत कर्मचारी म्हणून पुरस्कार देण्यात आला.. (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी )जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत अक्राणी तालुक्यातून उत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकारी म्हणून अशोक पावरा यांना दि.२७/२/२०२५ रोजी आदरणीय मा. सावनकुमार सो, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार तसेच आदरणीय मा. उदयकुमार कुसरकर सो उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम विभाग) यांच्या हस्ते सन्मान चिन्हं, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यांचा समवेत आदरणीय मा. प्रमोदकुमार पवार सो.अति. रिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,आदरणीय मा.पी.एस.कोल्हे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन, मा.विवेक गुंड साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आदरणीय राहुल गावडे साहेब प्रकल्प संचालक, मा.नंदकुमार सुर्यवंशी साहेब मा.लालु पावरा सो,समाज कल्याण अधिकारी,किरण गावित साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत सोन बू अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम गावात राबविण्यात आले त्यात प्रामुख्याने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मांडेल व्हिलेज,टी.बी. मुक्त गांव अभियान पुरस्कार घरकुलांचे उदिष्ट नुसार काम काम पूर्ण करणे,वूक्ष लागवड आदी विविध कार्याची दखल घेऊन तालुक्यातून उत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ग्रामपंचायत सोन बू चे ग्रामपंचायत अधिकारी अशोक एफ पावरा यांना गुणवंत कर्मचारी म्हणून पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मार्गदर्शन आदरणीय मनोज भोसले सो. गटविकास अधिकारी पंचायत समिती अक्राणी,पी. एस. पवार साहेब विस्तार अधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी संघटना रोषमाळ,सोन बू गावाचे ग्रामस्थ यांच्या वतीने शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
byMEDIA POLICE TIME
-
0