मोहम्मद सुवेझ सलमान खान यंदा पहिला रोजा (ऐनपुर ता रावेर ):- पवित्र रमजान महिन्यात रोजा म्हणजेच उपवास धरणे प्रत्येक मुस्लिम बांधवासाठी अनिवार्य असते. दि २ मार्च पासून सुरवात झाली असून पूर्ण रमजान महिना ३० दिवस उपवास ठेवले जातात. त्यात मोठ्या मंडळीसह चुमकल्यांचे रोजेही विशेष लक्ष वेधणारे असतात. दि.३ मार्च म्हणजे पवित्र रमजान महिन्याचा पहिला व दुसरा रोजा मोहम्मद सुवेझ सलमान खान या ९ वर्षीय मुलाचा आयुष्यातील पहिला रोजा त्याने यशस्वी केला. मोहम्मद सुवेझ खान ऐनपुर येथील समाजिक कार्यकर्ता सलमान मुस्तफा खान यांचा मुलगा आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0