हिप्परगा थडी ग्रामपंचायत सेवकाचा, मुलगा अनिल अंजनीकर बनला समाज कल्याण अधिकारी. (मारोती एडकेवार सर्कल: प्रतिनिधी सगरोळी) सगरोळी : हिप्परगा थडी येथील मातंग समाजातील ग्रामपंचायत सेवक सायबु नागोराव अंजनीकर, यांचा मुलगा अनिल सायबू अंजनीकर,यांनी एम पी एस सी अंतर्गत राज्य शासनाने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन 148 मार्क रँक घेऊन मातंग समाजातील पहिला समाज कल्याण अधिकारी बनला, गरीब परिस्थितीत अत्यंत चिकाटीची होती,वडील ग्रामपंचायत पाणीपुरवठा सेवक होते. आई शेत मजुरी करायची, या गरीब परिस्थितीच्या जाणिवाची उणीव अनिल अंजनीकर यांनी भरून काढले, सातवी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा थडी इथे त्यांचे शिक्षण पूर्ण झालं. व पुढील शिक्षण ते नांदेड येथील महाविद्यालयात घेतले,सतत अभ्यास व चिकाटीने अभ्यास करून आखिर अनिल अंजनीकर यांनी यश खूप मोठा यश प्राप्त केला, याबद्दल सर्व मातंग समाजातील सामाजिक नेते,कार्यकर्ते व सर्व समाजाने त्यांचे भरभरून कौतुक व स्वागत करत आहेत, समाज बांधव व गावकऱ्याकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

हिप्परगा थडी ग्रामपंचायत सेवकाचा, मुलगा अनिल अंजनीकर बनला समाज कल्याण अधिकारी.                                  
Previous Post Next Post