सालाबाद प्रमाणे यावर्षीहि आमच्या श्री दत्त विद्या मंदिर ( नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१८ व माध्यमिक शाळा क्र ११६ च्या वतीने वार्षिक स्नेह सम्मेलनाचे आयोजन.. सदर सम्मेलना साठी विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येंने उपस्थिती दर्शविली. नमुंमपा शैक्षणिक विभागातील स्नेह सम्मेलन होत असलेली एकमात्र शाळा म्हणजे श्री दत्त विद्या मंदिर सानपाडा. जिल्हापरिषद ते नवी मुंबई महानगरपालिका असा प्रवास असलेल्या सानपाडा शाळा ७३ वर्षाची झाली. सन २९५२ साली तत्कालिक सरपंच काशीनाथ पाटिल हयांच्या माध्यमातुन शाळेची उभारणी झाली. काळांतराने मा. सरपंच रामभाऊ मढ़वी हयांनी शाळे साठी अतिरिक्त खोल्या बांधुन शाळा इयत्ता ७ वी पर्यंत झाली तदनंतर सन्मा. नगरसेविका सौ.कोमल सोमनाथ वास्कर हयांच्या प्रयत्नाने शाळा G+२ भव्य दिव्य स्वरूपात उभारणीस आली व आपली शाळा एस एस सी ( १० वी ) पर्यंत झाली. सर्व सोयिनीयुक्त प्रशस्त स्वरूपाची आपली शाळा नवी मुंबई स्तरावर शैक्षणिक, क्रीड़ा, विज्ञान, सांस्कृतिक व स्वच्छतेत अग्रस्तानी आहे. आज आमच्या श्री दत्त विद्या मंदिर शाळेचा स्नेह सम्मेलन संपन्न होत असताना अनेक आठवणी व साठवणींचा उजाळा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सोशल मिडियावर व्यक्त केला. सानपाडा पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.देविदास कठाले हयांनी स्नेह सम्मेलनास उपस्थित राहुन विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करुन शाळेचे कौतुक केले तर या वर्षी इयत्ता १० वी तुन नवी मुंबई स्तरावर प्रथम आलेली कु.पुजा वंजारे हिचा विशेष सन्मान करण्यात आला तर विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातुन बैंगलोर ला विमान प्रवास करून परतलेल्या ४ विद्यार्थ्यांचा ही विशेष सन्मान करण्यात आला. सन्मा. नगरसैविका सौ.कोमल सोमनाथ वास्कर हयांच्या माध्यमातुन होत असलेल्या सेन्ह सम्मेलनास शाळेचे मुख्याध्यापक श्री.मंगल भोईर व महेंद्र पाटिल व शाळेच्या सर्व शिक्षक व बहुउद्देशीय कामगारांचे परिश्रम लाभले. शिवसेना महिला उपशहरसंघटिका सौ.स्मिता ढमाणे हयांनी निवेदना च्या माध्यमातुन महिलांचा प्रभाव उपस्थितां पुढे मांडला. नृत्यांगणा चे इशांत/ हिनल यांनी कोरोग्राफ़ी करून विद्यार्थ्यांचे नृत्य बसवले. शिवसेना विभागप्रमुख श्री.आशिष वास्कर, रणधीर सुर्वे , महिला आघाडी सौ.कविता ठाकुर, नलिनी डवले, सौ.आशा पाटिल हयांची उपस्थिती स्नेह सम्मेलनास लाभली. गायत्री केंद्राचे श्री. मन्नुभाई पटेल हयांनी सर्व पालक व विद्यार्थ्यां करिता जेवणाची व्यवस्था केली.सदर स्नेह सम्मेलनास उपस्थित मान्यवर , रहिवाशी, पालकवर्ग व विद्यार्था मित्रांचे आभार.Sanpada school|श्री दत्त विद्या मंदिर सानपाडा न.मु.म.पा शाळा "वार्षिक स्नेह सम्मेलन 2025" चे आयोजन करण्यात आले..

सालाबाद प्रमाणे यावर्षीहि आमच्या श्री दत्त विद्या मंदिर  ( नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१८ व माध्यमिक शाळा क्र ११६ च्या वतीने वार्षिक स्नेह सम्मेलनाचे आयोजन..                                                                      
Previous Post Next Post