अक्कलकुवा येथील पोलीस उपाधिक्षक आयपीएस दर्शन दुग्गड वर बलात्कार आणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. (कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार )नंदुरबार: लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर लग्नास नकार दिल्याने पीडित डॉक्टर महिलेने भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) 2021 च्या बॅचचे अधिकारी दर्शन दुग्गड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नागपुरातील इमामवाडा पोलिस ठाण्यात तिच्याविरुद्ध बलात्कार आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दुग्गडने महिला डॉक्टरसोबत लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन दुग्गड हे सध्या नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पीडित तरुणी नागपूरला लागून असलेल्या जिल्ह्यातील रहिवासी असून ती व्यवसायाने डॉक्टर आहे. यूपीएससीच्या तयारीदरम्यान दोघांची ओळख झाली, जी हळूहळू जवळीकामध्ये बदलली आणि ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.तिचा प्रेमात गुंतलेले. दर्शसन दुग्गड पीडितेला पोलिसांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये घेऊन जात असे, त्यामुळे तिची इतर अधिकाऱ्यांशीही ओळख होऊ लागली. अलीकडेच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि जेव्हा पीडितेने लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा दुग्गडने साफ नकार दिला. नागपुरातील इमामवाडा पोलिस ठाण्याच्या आवारातून या संबंधाला सुरुवात झाली, त्यामुळे पीडितेने वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्याच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासानंतर दुग्गड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन दुग्गड यांनी वयाच्या 25 व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण केली होती. याआधी तो दोन वर्षांपासून एका बांधकाम कंपनीत काम करत होता. मुळात तो यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देण्याचे टाळले आहे.

अक्कलकुवा येथील पोलीस उपाधिक्षक  आयपीएस दर्शन  दुग्गड  वर बलात्कार आणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.                                                                       
Previous Post Next Post