वक्फ कायदा विरोधात रावेर तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन - तहसीलदारांना निवेदन सादर रावेर - (प्रतिनिधी) ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड द्वारे १० एप्रिल ते जुलै कायदा २०२५ ला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने आज रावेर तालुका समस्त मुस्लीम समाजाच्य वतीने येथील तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी तहसीलदार बी.ए. कापसे यांना निवेदन देण्यात आले . मा . महामहिम द्रौपदी मुर्म राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन द्वारे निवेदना म्हटले आहे की सदर बिलाला लोकसभा मध्ये खासदारानी विरोध दर्शविला , ऑन लाईन व लेखी निवेदने व तक्रार सादर केले तरी सुद्धाअसंविधानिक कायद्याला मान्यता दिल्याने तो कायदा त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली . सदर मागणी चे निवेदन मुसलीम पंच कमेटी सदस्य शेख ग्यास , जमाते इस्लामी अध्यक्ष शेख शफीयोदिन सर , शेख एजाजुदिन ,डॉ. वसीम शेख , अड . मुजाहीद शेख , अड . शेख मुखतार , माजी नगर सेवक आसीफ मोहममंद , शेख सादिक , सरफराज खान सर , शेख महेमूद , अय्युब मेंबर , शेख रईस सर , ग्यासोदिन काझी, मंजूर टेलर , शेख कालू पहेलवान , शेख जाबीर , सै. आरिफ , निसार कुरेशी , अफसर पटेल , सफदर पहेलवान , यांच्या सह मोठ्या संख्याने नागरिक उपस्थित होते. पोलिस निरिक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी बंदोबस बंदोबस्त चोख ठेवला .
byमीडीया पोलीस टाईम
-
0