यावल ते भुसावळ आणि यावल ते फैजपूर या रस्त्याची दुरावस्था . (भुसावळ यावल प्रतिनिधी सुरेश खैरनार)यावल ते भुसावळ आणी यावल ते फैजपुर या दोन्ही महामार्गावरील रस्त्याची अवस्था पूनश्च खड्डेमय झाली असून अपघातास आमत्रंण देणारी ठरत असुन संबधीत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.दरम्यान यावल ते भुसावळ हा १८ किलोमिटरचा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग आणी यावल ते फैजपुर हा १७ किलो मिटर लांबीचा मार्ग राज्य महामार्गाकडे असुन या दोघ महत्वाच्या मार्गांवर वाहनाची मोठी वर्दळ असते.गेल्या काही दिवसांपासुन या दोघही मार्गावरील रस्त्यावर मध्यभागी व ईतर ठीकाणी मोठमोठी खड्डे निर्माण झाले असुन रस्त्याची अवस्था फारच बिकट झाली असुन रस्त्यावर पडलेले खड्डे भिषण अपघातास आमणंत्र देणारी आहे.यावल-भुसावळ या मार्गावरील निमगाव गावाजवळचे तिन ठीकाणी व्ही वळण आहे व या वळणाच्या कडेला मोठमोठी झाडेझुडपी असुन हे अत्यंत धोकादायक बनले असून याच ठीकाणी काही दिवसापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक विकास जंजाळे यांच्या दुचाकीचा अपघात होवुन त्यात त्यांना अपंगत्व आले आहे.तरी यावल सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन मोठा अपघात होण्यापुर्वी या दोघ महत्वाच्या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी असंख्य वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0