रावेर येथे उर्दु गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नूरजहाँ मॅडम यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कार. दिनांक १३-४-२०२५ वार रविवार रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार सोहळा डॉ बा सा कोकण कृषि विद्यापीठ दापोली येथे आयोजित करण्यात आला होता. उर्दु गर्ल्स हायस्कूल रावेर च्या मुख्याध्यापिका नूरजहाँ मॅडम फकीर मोहंमद यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कार ,श्री नारायण राणे खासदार रत्नागिरी मतदार संघ, श्री सुनील तटकरे खासदार,श्री सचींद्र प्रताप सिंह शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य, श्री संजय भावे कुलगुरू डॉ बा. सा. कोकण कृषि विद्यापीठ दापोली , महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ अध्यक्ष अण्णासाहेब श्री जे के पाटील सर यांच्याहस्ते देण्यात आला.त्याबद्दल जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक शैलेश राणे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करणयात आला या प्रसंगी उर्दू गर्ल हायस्कूलचे चेअरमन ॲड एस एस सय्यद साहेब व सर्व स्टाफ,उपस्थित होते

रावेर येथे उर्दु गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नूरजहाँ मॅडम यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कार.       
Previous Post Next Post