विवरा रावेर रस्त्यावर आशापारीक पुलाजवळ ट्रक व स्विफ्ट कारचा अपघात दोन जण जखमीसुदैवाने जिवीतहानी नाही . (रावेर तालुका प्रतिनिधी (जमील शेख)बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील विवरे गावा जवळील अशापारीक पुला जवळ रावेर कडून सावदा कडे केळी ने भरून जात असलेला लेला ट्रक क्रमांक ( युपी ७२ AT५९८६)यानी जळगाव कडून विवरे येथे येत असलेल्या मारोती स्विफ्ट कार क्र एम एच ०४ एफ एफ ४१३५ याला धडक दिल्याची घटना गुरुवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमार घडली सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही ट्रक चालक जखमी झाल्याची माहिती मिळाली. कार मध्ये एकच कुटुबांचे चार जण बालबाल वाचले आहेत अपघाताची माहीती मिळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती व सहकार्य केले, तसेच केळीने भरलेला ट्रक भर रस्त्यात उलटल्याने काही तास वाहतुक ठप्प झाली होती.घटनास्थळी निंभोरा पोलिसांनी घटनेची माहिती घेत पाहणी केलीसाईट पठ्ठ्या ठरताहेत अपघातास कारणीभुत काही दिवसापुर्वी बुऱ्हाणपुर अंकलेश्वर या महामर्गाचे दुरुस्ती करण्यात आली होती मात्र ठेकेराने साईड पटट्या न केल्याने या ठिकाणी सतत अपघाताची घटना घडत असून संबंधित विभागाने लक्ष देऊन योग्य ते करवाई करून साईड पटटया टाकण्याची मागणी वाहन चालकाकडून होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असुन रस्त्याने जड अवजड वाहने धावत असता त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघाताच्या घटनात वाढ झाली आहे,
byMEDIA POLICE TIME
-
0