नांदेड जिल्ह्यात बिबट्याची दहशत, नागरिक व शेतकऱ्यांना भीतीचे सावट. (मारोती एडकेवार जिल्हा/ प्रतिनिधी नांदेड )नांदेड : नांदेड जिल्ह्यात व बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बिबट्याचे दहशत निर्माण झाली असून,नागरिकांत मात्र भीतीचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडिया वरती अनेक ठिकाणी बिबट्या, दिसण्याचे चित्र व कुष्णूर एमआयडीसी येथे एका शेतकरी व कामगारावरती हल्ला केलेल्या बिबट्याचे, चित्र ग्राफी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसला, रोज नवीन एका गावातील, शिवारामध्ये बिबट्या आढळून येत आहे त्यामुळे, बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागामधील शेतकऱ्याला व कामगारांना मात्र भीतीच्या सावटाखाली,शेतीची कामे कराव लागत आहे.या बिबट्याच्या संचारामुळे शेतीतले कामे सुद्धा शेतकऱ्यांना करता येत नसून रात्रीच्या,वेळी हरभरा या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी सुद्धा शेतात जाण्यासाठी भीती निर्माण होत असून, या बिबट्याच्या भीतीने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे संभ्रम निर्माण झाले आहे. यावरती आळा घालण्यासाठी वन विभाग मात्र कुठेही पुढे दिसत नसून, प्रशासन तरी याकडे लक्ष देऊन या बिबट्यांना आवर घालावं अशी विनंती नागरिकांमधून होत आहे,याकडे प्रशासनाने लक्ष देतील का असे प्रश्न,व बिबट्यांना आळा घालतील, का असे प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहेत, काही दिवसांपूर्वी देगलूर तालुक्यातील, लखा,वनाळी या गावी बिबट्या आढळला असे माहिती मिळाली, तर नंतर कुष्णूर एमआयडीसी मध्ये एका शेतकऱ्यावरती हल्ला केला व या दोन दिवसांमध्ये बिलोली तालुक्यातील पाचपिंपली,डोणगाव,बेळकोणी व बामणी,या शिवारात बिबट्या दिसल्याचे चित्र सोशल मीडियावरती फिरत असून,यामुळे शेतकरी मात्र भीतीच्या, सावटाखाली आपल्या शेतातील काम मागे पडत आहेत या कडे,वन विभागाने लवकरात लवकर लक्ष देणे गरजेचे असल्याचे, शेतकऱ्यांचं व नागरिकांची विनंती आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0