आता मतमोजणी २१ डिसेंबरला...-- *उमेदवारात धाकधुक,उत्साहात पडली चिंतेची भर*. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती दि 2:-मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकींचा निकाल २१ डिसेंबरला लागणार असा निकाल दिल्यानंतर उद्या मतमोजणी होणार नाही. यामुळे उमेदवारांच्या,मतदारांच्या व विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले असून उत्साहावर चिंतेचे सावट पसरले... आज होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूका अंतर्गत निकालाची चक्क अठरा दिवस वाट पाहवी लागणार असल्याने विरोधी पक्षाच्या उमेदवारांत चिंतेचे सावट पसरले आहे. आधीच ईव्हीएमच्या माध्यमातून मत हेराफेरी होत असल्याची चर्चा अख्या देशात सुरू आहे. यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवारांत धाकधूक वाढली असून आता अठरा दिवस ईव्हिएम मशीनवर रात्रंदिवस पाळत ठेवावी लागणार आहे.. आरक्षण पध्दतीला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार काही नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूका महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांद्वारे रद्द करण्यात आल्या होत्या. आता त्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या आणि काही प्रभागाच्या निवडणूका २० डिसेंबरला होणार आहेत व लगेच २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

आता मतमोजणी २१ डिसेंबरला...-- *उमेदवारात धाकधुक,उत्साहात पडली चिंतेची भर*.                                                            
Previous Post Next Post