जांब येथील शेतकऱ्यांना पाणी फाउंडेशन तर्फे गट शेती प्रीमियर लीग २०२५ चा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. _______________________________________________संजय भरदुक प्रतिनिधी (मंगरुळपीर वाशिम ) _______________________________________________________दिंनाक -०६/१२/२०२५ शनिवार _____________________________मंगरूळपीर---तालुक्यातील शेलूबाजार जवळील नागी (ईचा) येथे ६ डिसेंबर शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक,सार्वजनिक सभागृह, येथे सन्मान सोहळा चे पाणी फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत श्री योगेश कुंभेजकर (जिल्हाधिकारी वाशिम), डॉ.अविनाश पौळ (मुख्य सल्लागार पाणी फाउंडेशन),आरिफ शहा (जिल्हा कृषी अधिकारी वाशिम),अनिसा महाबळे (आत्मा संचालक)), श्री सचिन कांबळे (तालुका कृषी अधिकारी मं.पीर), अश्विनी भोसले (तालुका कृषी अधिकारी कारंजा) यांच्या शुभहस्ते जांब येथील डॉ.पंजाबराव देशमुख शेतकरी गटाला व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी नैसर्गिक साधनसंपत्ती वापरून गटामार्फत सेंद्रिय शेती करतात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमामध्ये सहभागी अनेक शेतकरी गट व शेतकऱ्यांची उपस्थिती होती सर्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी सहकारी, कृषी सहायक , पाणी फाउंडेशन टीम, आत्मा संचालक कॄषी विभाग यांचे मोलाचे मार्गदर्शन सहकार्य लाभले.तसेच गावातील शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0