**पाडळसे येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी; प्रतिमा पूजन व महिलांचा सन्मान. (पाडळसे (ता. यावल) | वार्ताहर** - पाडळसे येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने महादेववाडीमध्ये आणि ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले, तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.महादेववाडीमध्ये प्रकाश कचरे आणि सौ. इंदुबाई कचरे या दांपत्याच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील सुरेश खैरनार, ग्रामपंचायत सदस्या पल्लवी तायडे, विकास सोसायटी संचालक किरण कचरे, नितीन कचरे, आनंद तायडे, पुष्पाबाई कचरे, अंजनाबाई कचरे, माजी सरपंच ज्ञानेश्वर तायडे, सिताराम कचरे, जितेंद्र कचरे, समाधान कचरे यांच्यासह समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याचबरोबर, ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. गुणवंती पाटील यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी एस. सी. वाघमारे, ग्रुप शिपाई लक्ष्मण बऱ्हाटे, सुरेश चौधरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात माजी सरपंच ज्ञानेश्वर तायडे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती आणि दूरदृष्टी विशद केली. त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे, समाजकार्याचे आणि न्यायप्रियतेचे दाखले त्यांनी दिले.यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महिलांना 'राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. अंजनाबाई दामोदर कचरे आणि सरला राजू झोपे या दोन महिलांना प्रशस्तिपत्र, रोख पाचशे रुपये आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या उपक्रमाने महिलांच्या कार्याला प्रोत्साहन मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0