*शहर बदलतंय: कार्नाक आणि विक्रोळी पूल १० दिवसांत होणार खुले, मुंबईकरांना दिलासा*. मुंबई – भास्कर लिंगम : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक महत्त्वाची पावले उचलली जात असून येत्या १० दिवसांत कार्नाक पूल आणि विक्रोळी पूल प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहेत. या दोन्ही पूलांच्या सुरूवातीमुळे दक्षिण मुंबई व पूर्व उपनगरांतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे.कार्नाक पूल हा चार लेनचा असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसराशी थेट जोडलेला आहे. १९२० च्या दशकात बांधण्यात आलेला जुना पूल धोकादायक स्थितीत आल्यामुळे काही काळापूर्वी पाडण्यात आला होता. त्यानंतर नवीन पूलाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. आता नवीन आणि मजबुत बांधकामासह सुसज्ज असा पूल प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे.दुसऱ्या बाजूला, विक्रोळीतील पूल सुद्धा महत्त्वाचा आहे. तो पूर्व द्रुतगती मार्गाला पश्चिम द्रुतगती मार्गाशी जोडतो आणि त्यामुळे संपूर्ण मुंबईतील मध्यभागी असलेल्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः सकाळच्या व सायंकाळच्या peak hours मध्ये हा पूल वाहतूक सुरळीत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.महानगरपालिकेचे आणि MMRDA चे अधिकारी सांगतात की, हे दोन्ही पूल १० दिवसांत औपचारिक उद्घाटनानंतर सर्वसामान्यांसाठी खुले केले जातील. स्थानिक नागरिक आणि रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.वाहतूक सुलभ होण्याबरोबरच या पुलांमुळे इंधनाचा खर्च, प्रदूषण आणि प्रवासातील मानसिक तणाव देखील कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः सीएसएमटी परिसरात होणारी गर्दी आणि ट्रॅफिक जाम यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्नाक पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.शहरासाठी पुढचे पाऊलया दोन्ही पूलांचे उदघाटन म्हणजे केवळ वाहतुकीच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर संपूर्ण शहराच्या विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. मुंबईच्या नागरी जीवनशैलीमध्ये या बदलामुळे नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतील.
byमीडीया पोलीस टाईम
-
0