खिरोदा प्र यावल गावात मोठ्या प्रमाणावर अर्वेध देशी दारू विक्री संबंधित प्रशासनाचे झोपेचे सौग.. (खिरोदा प्र यावल प्रतिनिधी). तालुक्यातील सावदा हद्दीतील खिरोदा प्र यावल गावात मोठ्या प्रमाणावर तेली नामक व्यक्ती अर्वेधरित्या देशी दारू विक्री करत असून देखील प्रशासन याकडे दूर्लक्ष करत आहे या दारुच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होतांना दिसत आहे याकडे मात्र पोलिस प्रशासनासह संबंधित प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील जनतेकडुन बोलले जात आहे.तसेच आमच्या परिवारातील लोकांना दारु पाजून पाजुन मारुन टाका तेव्हाच खिरोदा प्र यावल गावांसह परिसरातील दारू अड्डे बंद करा अशी संतप्त प्रतिक्रिया चे चित्र महिला गावकऱ्यांसह परिसरातील जनतेला खुप त्रास देत आहे गावातील अनेक संसार दारू मुळे उध्वस्त होत आहे त्यामुळे गावातील महिला, तेली नामक व्यक्तीचा देशी दारू विक्री करण्याचा परवाना तपासून गावातील अर्वेध देशी दारू विक्री कायम बंद करतील अशी गावातील महिला गावकऱ्यांकडुन पोलिस प्रशासनाकडे रास्त स्वरुपाची मागणी आहे. याकडे संबंधित प्रशासन लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करेल का ? यांकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे आणि प्रश्न उपस्थित झाला आहे त्याचबरोबर आशाही व्यक्त करत आहे ..संबधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन दारूमुळे उध्वस्त होणारे अनेकांचे संसार वाचवावे आणि खिरोदा प्र यावल गावातील दारू कायमस्वरूपी बंद करावी अशी रास्त स्वरुपाची मागणी गावातील महिला गावकऱ्यांकडुन परिसरातील जनतेची मागणी आहे
byMEDIA POLICE TIME
-
0