सावदा येथे हजरत पीरमंजनशावली महोत्सवा साठी भक्तांचा अभूतपूर्व महासागर*** . (सावदा प्रतिनिधी ) गेल्या काही वर्षापासून मंजनशाह बाबांच्या भक्तांमध्ये लक्षणी वाढ होत आहे संपूर्ण परिसरातून सर्व जाती धर्माचे मंजन शाह बाबा चे भक्त संदलच्या दिवशी आवर्जुन हजेरी लावता काल शनिवार संदल महोत्सवाचे निमित्ताने हजारो भाविक मंजन शाह बाबा परिसरात जमले होते जिकडे तिकडे भक्तांचा महासागर फुलून गेला होता चंद्राच्या साक्षीने हजरत पीर मंजन शाह वली च्या दर्गा वर हा संदल चढवण्यात आला आसमंताला भेदून टाकणारा ढोल ताशांच्या आवाज अगरबत्ती व उदाच्या धुपारणीचा पंचक्रोशीत पसरलेला सुगंध धुमधडाक्यात निघालेल्या या संदलची चार तास मिरवणूक करण्यात आली मंजनशा बाबा विश्वस्त व महमूद बिस्मिल्ला पिंजारी मुजावर घोड्यावर चादर टाकून फुलांच्या हराने सजविण्यात आले एका एका गाडीवर संदलची सामग्रीय एक तबक ठेवण्यात येऊन त्यात चंदनचा लेप असलेला संदल ठेवण्यात आला या ठिकाणी उपस्थित सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, देवरे दादा, मयूर पाटील, राकेश झोपे, समाजसेवक पीरखा सेठ, मा. न. नगरसेवक शेरखा मेंबर, रमजान तडवी, भावी नगरसेवक मुराद तडवी, कृषी बाजार समिती संचालक सैय्यद अजगर, कुशाल जावळे व्हाईस चेअरमन, पिंटू धांडे व दर्गा संदल आयोजक नवाज तडवी आणि असंख्य भक्तांनी सकाळी दहा वाजता पासून शहीद अब्दुल हमीद ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचा लाभ घेतला ..
byMEDIA POLICE TIME
-
0