कौमी एकता फाउंडेशन करणार गोवंश हत्या बंदी कायद्या विषयी जनजागृती.कौमी एकता फाउंडेशन चा कौतुकास्पद पुढाकार. (फैजपूर प्रतिनिधी )फैजपूर येथील कौमी एकता फाउंडेशन चे नुकताच सभा पार पडली तसेच सभेच्या सुरुवातीला पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड अतिरिकी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी राज्यात लागू असलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची माहिती तसेच याची अमल बजावणी साठी परिसरात लवकरच मोहीम सुरू करणार असून यंदा या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मुभा दिलेल्या जनावरांचीच कुर्बाणी द्यावी असे सभे मध्ये सर्वानुमते ठरले आहे.शासनाने मुभा दिलेल्या जनावरांची कुर्बाणी करतांना नियमावली चे पालन करावी याविषयी सोशल मीडिया च्या माध्यमातून तसेच पॉम्पलेट छापून जनजागृती करणार आहे. त्यांच्या या निर्णयाचा परिसरातून कौतुक होत आहे.या प्रसंगी संस्थे चे अध्यक्ष शेख कुर्बान, उपाध्यक्ष शेख इरफान,सय्यद असगर,सचिव सय्यद जावेद,आसिफ दादा मोहम्मद, जफर खान, कलीम खा, एड.शेख खालिद,जाबिर खान,शेख रफिक,शेख आसिफ,शेख आरिफ,शेख इद्रीस, हमीद शेख,शेख अकील, आदीसह उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0