सेवानिवृत्त पोलिस अधिकारी पोलीस अंमलदार बहुउद्देशीय विकास संस्थेचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)परभणी:आज दि.०१ जून रोजी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी पोलिस अंमलदार बहुउद्देशीय विकास संस्था परभणी यांचा दुसरा वर्धापन दिनानिमित्त निमंत्रण मा. ना. मेघना दीदी बोर्डीकर, राज्यमंत्री आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. राहुल पाटील साहेब, आमदार परभणी विधान सभा, मा. राजेश भैय्या विटेकर साहेब, पाथरी विधान सभा, मा. रत्नाकर गुट्टे साहेब, गंगाखेड विधान सभा, प्रथम महापौर श्री प्रताप भैय्या देशमुख साहेब, परभणी,हिंगोली जिल्हा अध्यक्ष श्री. एस एस चव्हाण साहेब, व त्यांची टीम.अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधी श्री.भिमराव खंडारे साहेब, वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधी श्री. रमेश ताजने साहेब,नांदेड शाक्य संघ विजय उजेडकर सर व त्यांची टीम,नांदेड समर्पण चे केंद्रे साहेब,संभाजी होनराव साहेब व त्यांची टीम, बीड येथील अन्वर शेख सर, पवार मॅडम व त्यांची टीम चे लोकासह परभणीचे सर्व सन्माननीय सदस्य कार्यक्रमाला मोठया संख्येने सामील झाले होते.सर्व प्रथम पहलगाम व सैनिक व पोलिस शहीत झालेल्याना दोन मिनिट शांत राहून श्रद्धांजली वाहण्यात आली, माननीय राहुल पाटील साहेब आमदार परभणी विधानसभा प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख साहेब यांचे उपस्थितीत दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मा. राहुल पाटील साहेब यांनी पोलिसांच्या मागण्याबाबत पावसाळी अधिवेशन मध्ये पाठपुरावा करण्यात येईल असे ठाम पणे सांगितले तसेच पोलिसांना सेवानिवृत्त पोलिसांना त्यांना पोलीस अधीक्षक साहेबांनी कार्यासाठी दोन रूम द्याव्या अशी लागलीच त्यांनी पोलीस अधीक्षक साहेबांना फोन करून बोलणे केले. व पावसाळी अधिवेशन मध्ये महसूल विभागाप्रमाणे पोलिसांची वेतनश्रेणी मिळालीच पाहिजे म्हणून प्रश्न उपस्थित करेल असे सांगितले तसेच परभणी शहराचे प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख यांनी सुद्धा वरच्या लेवलला तुमचे प्रश्न मांडतो साथ देतो, असे सांगितले. मा. नामदार मेघना दीदी बोर्डीकर यांनी फोनवरून सभागृहाला अस्वस्थ केले की मी तुमचा प्रश्न सेवेतील पोलिसाप्रमाणे आरोग्य हा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.असे त्यांनी व आमच्या कार्यक्रमाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या परभणी जिल्ह्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कोटेसंस्थापक उपाध्यक्ष अब्दुल खालेक साहेब, मुरलीधर महाजन साहेब, प्रकाश गायकवाड सर,आमच्या संस्थेचे सचिव जे पी गायकवाड, आली साहेब, माधव अण्णा लोकुलवार साहेब, अफसर खान पठाण, फुलपगार साहेब, नगरसाळे साहेब, वामन नागरगोजे साहेब, चाटे साहेब, दत्तराव चाफळे साहेब, परमेश्वर काकडे साहेब, अशोक वैद्य साहेब ,भांबड साहेब, शंकर जोशी साहेब, अशोक गावंडे साहेब, उद्धव लाड साहेब, गणेशराव कदम साहेब, प्रसाद देशमुख साहेब, रंगनाथ पाटील साहेब, विशंभर गावंडे साहेब, अंकुश जाधव साहेब, माधव रंजवे साहेब,श्रीराम राठोड साहेब, विठ्ठलराव सूर्यवंशी साहेब, सुभाषराव बाराते साहेब, या सर्वांनी सुरुवातीपासून कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून पाठबळ दिले, काहींनी स्वतः सहभाग नोंदीला त्या सर्वांचे आभार लोकुलवार अण्णा ,जे पी गायकवाड जिल्हा सचिव यांनी मानले.

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी पोलीस अंमलदार बहुउद्देशीय विकास संस्थेचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा.                                                                               
Previous Post Next Post