*चंद्रकांत रघुवंशी यांना आदिवासी संघटना उद्या अक्कलकुवा येथे काळे झेंडे दाखवणार!**भांडे वाटपाऐवजी जमीन वाटपाचा कार्यक्रम घ्यावा- सुशिलकुमार पावरा*. नंदूरबार प्रतिनिधी:- दिनांक ३ जून २०२५ रोजी सोरापाडा अक्कलकुवा येथे महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगार भांडी वाटप योजना अंतर्गत भांडे संच वाटप कार्यक्रम आहे.या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी,अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी हे येणार आहेत.यापैकी चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून विरोध दर्शणार असल्याबाबतचे पत्र आदिवासी संघटनांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.यावेळी भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासी बांधवांच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशीर, अवैद्य, बोगस ,फेरफार करून हडप केल्या आहेत.आदिवासींच्या जमिनी परत मिळाव्यात, म्हणून आमच्या आदिवासी संघटनांचा कायदेशीर लढा सुरू आहे.चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील शिवसेना शिंदेगटाच्या कार्यक्रमात आदिवासी संघटना ह्या तीनपाट आहेत, असा शब्दप्रयोग करून, शिवीगाळ करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित करण्याचे,तुच्छ लेखण्याचे काम केले,म्हणून आदिवासी समाजात चंद्रकांत रघुवंशीविरोधात तीव्र संताप आहे,राग निर्माण झाला आहे.नंदूरबार जिल्ह्य़ातील अक्कलकुवा, शहादा,नवापूर व नंदूरबार हे ४ मतदार संघ आदिवासींसाठी राखीव असतांना यापैकी शहादा व नंदुरबार हे २ विधानसभाक्षेत्र खुले मतदारसंघ करण्याची चंद्रकांत रघुवंशी मागणी करत आहेत, तसे बोलून दाखवत आहेत.म्हणून आम्ही शहादा येथे चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला व चंद्रकांत रघुवंशी यांना चेतावणी दिली की,चंद्रकांत रघुवंशी जिथे जिथे कार्यक्रमाला जातील,तिथे तिथे चंद्रकांत रघुवंशींना काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहोत. भांडे संच वाटप कार्यक्रमास आमचा विरोध नाही,या कार्यक्रमात येणा-या अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे आदिवासी आमदार आमश्या पाडवी यांचाही विरोध नाही व शिवसेना पक्षाचा ,येणा-या आदिवासी पदाधिकाऱ्यांचाही विरोध नाही.परंतू ज्यांना आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर हडप केल्याय, जे वारंवार आदिवासी विरोधी वक्तव्य करतात, त्या चंद्रकांत रघुवंशीचा विरोध आहे. चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी बांधवांना भांडे वाटत न फिरता,आदिवासींच्या ज्या जमिनी हडप केल्या आहेत, त्या जमीन वाटपचा कार्यक्रम घ्यावा. आम्ही शहादा येथे ज्यापद्धतीने आमच्या आदिवासी स्टाईल ने चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला होता,त्यापद्धतीने उद्या ३ जून २०२५ रोजी अक्कलकुवा येथे चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहोत, अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0