निपाणी टाकळी येथे पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू : सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्राम पंचायत निपाणी टाकळी येथे पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर यांची 300 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नाना भुते सर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, ग्रामपंचायत निपाणी टाकळी चे सरपंच सुनील सावंत, उप सरपंच लहान्नप्पा हरकळ, शिवाजी ढगे,इतर शालेय शिक्षण समितीचे सदस्य,ग्रामस्थआदी मान्यवर उपस्थित होते.तर ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सुनील सावंत उपसरपंच लहान्नप्पा हरकळ, सौ.लक्ष्मी कुरधने,सखाराम कुरधणे, माऊली हरकळ, बाबासाहेब सावंत आदींची उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले.

निपाणी टाकळी येथे पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.                                 
Previous Post Next Post