वर्ध्यात बनावटी दारू कारखान्यावर पोलिसांचा धाडसी छापा.रामनगर पोलिसांची दमदार कामगिरी.. (वर्धा जिल्हा विभागीय प्रतिनिधी मो मकसुद बावा) रामनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस स्टाफ पोउपनि धिरज खोब्रागडे, सफौ राजु साहु, दारूबंदी पथकाचे प्रमुख पोहवा अवी बनसोड सोबत पोकॉ विकी अनेराव, सुरज राठोड, प्रशांत साहु आणी भुषण दांडेकर हे पो.स्टे. हददीत पेट्रोलींग करीत असता मिळालेल्या माहितीवरून त्यांनी राजेश जयस्वाल रा. वार्ड क्रमांक ०३ सिंदी मेघे याचे घरावर प्रो रेड केला असता त्याचे घराचे आत शेड मध्ये बनावट दारू तयार करण्याचा कारखाना मिळुन आला. तिथे रिकाम्या दारूच्या बाटल्यांसह इतरही बनावट दारूनिर्मितीचे साहित्य मिळुन आले. जवळपास २५० दारूच्या पेटया, दारू पॅकींग करीता लागणारे खरडे, विदेशी दारूचे सिलकॅप, एक चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. १२/यु.एम./६६३४ तसेच बनावट दारू पॅकींग करीता लागणारे साहित्य असा एकुण ५,३१,१५०/- रू चा माल मिळुन आल्याने आरोपी नामे राजेश जयस्वाल रा. सिंदी मेघे याचे विरूदध दारूबंदी कायदयान्वये सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.प्रस्तुत कार्यवाही ही मा. श्री. अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. सदाशीव वाघमारे अपर पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. प्रमोद मकेश्वर, उप विभागीय पोलीस अधीकारी वर्धा, श्री. अजय भुसारी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामनगर यांचे मार्गदर्शनात पोउपनि धिरज खोब्रागडे, सफौ राजु साहु, दारूबंदी पथकाचे प्रमुख पोहवा अवीनाश बनसोड सोबत पोकॉ विकी अनेराव, सुरज राठोड, प्रशांत साहु आणी भुषण दांडेकर सर्व पोलीस स्टेशन रामनगर यांनी केली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0