रावेर तालुका अखिल भारतीय जीवा सेना सचिव पदी राजेश सावळे तर अध्यक्षपदी सुरेंद्र शिरनामे.. रावेर तालुका प्रतिनिधी (जमील शेख) रावेर तालुव्यातील वाघोदा येथे झालेल्या अखिल भारतीय जीवा सेना रावेर तालुका 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या दहावी बारावी गुणगौरव सोहळा तसेच मानाचा नाभिक हिरकणी पुरस्कार व शिवरत्न वीर शिवाजी महाले पुरस्कार याबद्दल चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुरेश भाऊ ठाकरे तंटामुक्ती अध्यक्ष हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय जीवा सेना जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सेठी होते यानंतर अखिल भारतीय जीवा सेना रावेर तालुक्याची नवीन कार्यकारणी करण्यात आली यामध्ये तालुकाध्यक्षपदी सुरेंद्र भाऊ शिरनामे यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी राजेश सावळे कार्याध्यक्षपदी योगेश भास्कर अमोदकर व गोकुळ साळुंखे उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली याप्रसंगी अखिल भारतीय जीवा सेना जिल्हा संघटक योगेश बोरनारे धनराज धनराज बोरणारे सर हेमंत चांदवे राजेश बोरनारे किशोर बोरनारे महेंद्र सापकर अनिल मानकरे विश्वास कुवर उमेश निंबाळकर महेंद्र बोरनारे काशिनाथ आटवाडेकर नामदेव निंबाळकर चिंतामण आमोदे शांताराम निंबाळकर प्रभाकर मानकरे दिनेश जैनकार किरण बोरसे पुंजाजी तांदूळकर राज निंबाळकर चेतन जैन कार यांच्यासह नाभिक समाज बांधव उपस्थित होते सूत्रसंचालन धनराज बोनारे सर तर आभार उमेश निंबाळकर यांनी मानले
byMEDIA POLICE TIME
-
0