अटकळी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी आराखडा बैठक संपन्न.. (गणेश कदम ग्रामीण प्रतिनिधी बिलोली )आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी मौजे अटकळी तालुका बिलोली येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा 2 गावस्तरीय हवामान अनुकूल आराखडा तयार करणे संदर्भात शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली सदरील बैठकीमध्ये पोखरा योजनेच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये pocra अंतर्गत विविध योजने निहाय माहिती देण्यात आली तसेच गाव स्तरीय हवामान अनुकूल आराखडा कसा तयार करायचा या संदर्भात मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांचे गट निर्मिती तसेच शेतकरी उत्पादन कंपनी नोंदणी करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली शेतकरी गट वैयक्तिक शेतकरी साठी विविध योजना याविषयी माहिती दिली तसेच खरीप हंगामा मधील सोयाबीन पिकावरील पीक संरक्षण बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच गावातील महादाबाई मारुती भिंगे यांना गोपीनाथ मुंडे अपघात सानूग्रह अनुदान दोन लाख चा चेक मान्यवरांचे हस्ते देण्यात आल या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र समोरचे शास्त्रज्ञ डॉक्टर कृष्ण अंभोरे सर , उप कृषी अधिकारी महेश कुरुंद सहायक कृषी अधिकारी कमठेवावाड साहेब स्वामी साहेब सावळे साहेब उपस्थित होते गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील शेतकरी उपस्थित होते

अटकळी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी आराखडा बैठक संपन्न..                                                                      
Previous Post Next Post