दारू व गुटखा बंद करा अन्यथा, आत्मदहन करणार सय्यद इरफान. (मारोती एडकेवार नांदेड ज़िल्हा/प्रतिनिधी )नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथील युवा तरुण,व शिवसेना उबाठा पक्षाचे शाखा अध्यक्ष,सय्यद इरफान यांनी.आज दि 13/8/2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हिप्पारगा थडी येथे, सरपंच इनामदार रहेबर,यांना दारू,व गुटखा बंद करा.अन्यथा आत्मदहन करू असे,सय्यद इरफान यांनी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला. हिप्परगा थडी गाव हे, छोटसं गाव मुजरी करून वास्तव असणारे आहे, इथले युवा तरुण,व दारू गुटख्यामुळे व्यसनी होऊन अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्यामुळे अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयास,दारू बंद करण्याचे, निवेदन देण्यात आले.परंतु ग्रामपंचायत कार्यालय,याकडे लक्ष देत नसून, त्यांना ग्रामपंचायत कार्यालयास आज दिनांक 13/ 8/2025 रोजी, दारू व गुटखा बंद करण्याचे निवेदन सादर करण्यात आले आहे,व दिनांक 20/8/2025 रोजी पर्यंत गावात दारू व गुटखा बंद झाले नाही,तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करणार, असे आमच्या प्रतिनिधीशी सय्यद इरफान यांनी सांगितले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0