स्वातंत्र्यदिनाच्ये औचित्य साधून, साहेबराव सगरोळीकर यांना पदोन्नती. (.मारोती एडकेवार नांदेड/जिल्हा प्रतिनिधी ) नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत, दबंग पोलीस कर्मचारी साहेबराव सगरोळीकर, यांना स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून.साहेबराव सगरोळीकर यांना पदोन्नती मिळाळी, साहेबराव सगरोळीकर हे सगरोळी,येथील रहिवाशी असून अनेक,दिवसापासून नांदेड ज़िल्हा,धर्माबाद,व सध्या देगलूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत, त्यांनी क्राईम ब्रँच च्या माध्यमातून. अनेक पोलीस प्रशासनातील ऑपरेशन मध्ये रिक्स घेऊन,अनेक गुन्हेगारांना शोधून काढण्याचे कार्य व गुन्हेगारांमध्ये,सारोळीकर या नावाची,एक धमक ठेवून त्यांच्या स्टेशन अंतर्गत, गुन्हेगारीला कसा आळा बसेल याचा नियोजन करून, सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचं व पोलीस प्रशासनाच्या वतीने जनतेमध्ये, पोलिसांचं महत्त्व व पोलीस हे जनतेच्या सोबत असल्याचं महत्व, व समाजातील सामान्य लोकांना व गुन्हेगारा होण्यापासून, मार्गदर्शन करणं हा त्यांचा कार्य, सतत करत असतात.त्यांच्या या कार्यची, नांदेड जिल्हा पोलीस अधिकारी, देगलूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, यांनी साहेबराव सगरोळीकर, यांच्या कार्याची दखल घेऊन, व नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त पदोन्नती मिळाली आहे त्याबद्दल सर्व पोलीस प्रशासनातील कर्मचारी व अधिकारी व पत्रकार बांधव सर्वांकडून साहेबराव सगरोळीकर यांचे,अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्वातंत्र्यदिनाच्ये औचित्य साधून, साहेबराव सगरोळीकर यांना पदोन्नती.                                                                          
Previous Post Next Post