रामतीर्थ पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधात ४ जणांवर गुन्हा दाखल. (आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि नांदेड ग्रामीण ) प्रतिनिधि बिलोली : बिलोली तालुक्यातील केरुर येथील एका चोरीच्या घटनेत चोरी करणारे चोर शोधून काढतो म्हणून गावातील काही युवकांना पानाचा विडा व तांदूळ खाऊ घातल्या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधात एका भामट्यासह इतर ३ जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बिलोली तालुक्यातील केरुर येथील गंगाधर राम आरोटे यांच्या घरात १९ जुलै रोजी घरफोडी झाली होती. घरमालकाने सदर चोरीची रामतीर्थ पोलिसात फिर्याद देण्याऐवजी धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील गंगाराम सुंका कदरी (७९) या वयोवृद्ध भामट्या जादूगारास ११ ऑगस्ट रोजी गावात बोलून घेऊन गावातील संशयित असलेल्या युवकाला भामट्याच्या सांगण्यावरून तांदूळ व पानाचा विडा खाऊ घातला. भामट्याच्या म्हणण्यानुसार ज्यांनी चोरी केली असेल त्या व्यक्तीचा तोंड उघडणार नाही, तो चोर असेल असा दावा केल्यानंतर गावातील संशयित ४ युवकांना विडा व तांदुळ खाऊ घातले. विडा व तांदूळ खाल्यानंतर त्या युवकांना काहीच झाले नसल्याने चोरीच्या आरोपात नाहकयुवकांची बदनामी केल्याप्रकरणी परमेश्वर कंटीराम राठोड यांच्या फिर्यादीवरून चोरी झालेल्या घरमालक गंगाधर राम आरोटे, वडील रामा नारायण आरोटे, भाऊ राजू नारायण आरोटे व धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील भामट्या जादूगर गंगाराम सुंका कदारी याच्या विरोधात महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम अंतर्गत ११ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आदमपूर बिट जमादार रामचंद्र काळे हे पुढील तपास करीत आहेत.

रामतीर्थ पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधात ४ जणांवर गुन्हा दाखल.                                                                   
Previous Post Next Post