पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी साने गुरुजी विद्यालयात अमली पदार्थावर केली जनजागृती. यावल दि.१४ ( सुरेश पाटील )आज गुरुवार दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान भारत सरकार यांच्या अंमली पदार्थ जंन जागृती मोहीम या संकल्पनेच्या माध्यमातून यावल पोलीस स्टेशनच्या वतीने यावल नगरपरिषद संचलित पी.एम.श्री साने गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम व त्या विषयी जनजागृती या विषयावर निबंध स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.सदरची निंबंध स्पर्धा इयत्ता ८ ते १० पावेत्तोचे विध्यार्थ्यांचा गट व ११ वी ते १२ वी पावेतोच्या विध्यार्थ्यांचा गट अशा दोन गटात निंबंध स्पर्धा यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. स्पर्धेनंतर अंमली पदार्थचे दुष्परिणाम त्यावरील उपाय योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन पोलीस निरीक्षक धारबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.सदर स्पर्धेत इयत्ता ८ वी ते १२ वी पावेतोच्या विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला.निंबंध स्पर्धेस विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील सर, तसेच उपप्राचार्य ए.एस.इंगळे सर, पर्यवेक्षक व्ही.ए. काटकर सर, व ज्येष्ठ शिक्षक डी. एस.फेगडे सर उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी साने गुरुजी विद्यालयात अमली पदार्थावर केली जनजागृती.           
Previous Post Next Post