हिप्पारगा थडी ग्रामपंचायत,व जि.प. शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. सरपंचाकडून विद्यार्थ्यांना बॅग वाटप,तर उपसरपंचाकडून वही आणि पेन. ( मारोती एडकेवार नांदेड /ज़िल्हा प्रतिनिधी) नांदेड: बिलोली तालुका,हिप्परगा थडी येथे ग्रामपंचायत, व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत. स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय येथे, सरपंच इनामदार रहेबर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक भुमया मुत्यापोड,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील,शाळेच्या विद्यार्थी संख्येपैकी शाळेच्या 50% विद्यार्थी पहिली ते आठवीपर्यंतच्या, सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिनानिमित्त व महामानवांच्या विषयी, आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद शाळेचे, पर्यावरण शिक्षक प्रेमी श्री गेंदेवाड सर यांनी सूत्रसंचालन केले.व ग्रामपंचायत कार्यालय हिप्पारगा थडी चे युवा सरपंच इनामदार रहेबर रहीमबेग यांनी, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना 1ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके ठेवण्यासाठी,विद्यार्थ्यांना बॅग स्वतंत्र दिनानिमित्त भेट दिले, व नवनिर्वाचित ग्रामपंचायत उपसरपंच, सौ. चंद्राबाई व्यंकट तुकडे, यांनी वही व पेन वाटप करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यदिनानिमित्त, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी,विविध उपक्रम करून दाखवला. यावेळी उपस्थित. सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष,पत्रकार बांधव, व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष,व उपाध्यक्ष, व सर्व विद्यार्थ्यांचे पालक, व विद्यार्थी व शिक्षण प्रेमी,आणि गावातील सर्व युवा तरुण,सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षातील कार्यकर्ते,व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, व सर्व गावकरी,उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्य दिन हिप्परगाथाडी ग्रामपंचायत कार्यालय, व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हिप्पारगा थडी ग्रामपंचायत,व जि.प. शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. सरपंचाकडून विद्यार्थ्यांना बॅग वाटप,तर उपसरपंचाकडून वही आणि पेन.                            
Previous Post Next Post