आई-वडिलांच्या स्मरणार्थ जि.प. शाळा बाळापूर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप. (धर्माबाद (गजानन वाघमारे) बाळापूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सेवानिवृत्त शिक्षक गोपाळराव विष्णूपंत गुब्बी यांच्या तर्फे त्यांचे वडील विष्णूपंत गुब्बी, आई यमुनाबाई व पत्नी प्रभावती यांच्या स्मृती प्रित्यर्थ वही, पेन, पुस्तके, लेझीम, शालेय गणवेश, इत्यादी शालेय साहित्याचे 140 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक वर्णी नागभूषण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक निलेश पाटील बाळापूरकर, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष जी. पी.मिसाळे, मराठी पत्रकार संघाचे ता.अध्यक्ष सुदर्शन वाघमारे, पेन्शनर असोसिएशनचे सचिव विठ्ठलराव रटकलकर, शा.व्य.स.अध्यक्ष रवि येलमोड, उपाध्यक्ष भूमेश येनगंटीवार, सदस्य माधवराव शिंदे, साईनाथ डेबेकर, हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक रामकुमार चिलकेवार यांनी केले तर आभार मुख्याध्यापक माधवराव वारले यांनी मानले आहे.सौ. वॉस्टर मॅडम, सौ. पाठक मॅडम, श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती बोईवार मॅडम, सौ. कोमटवार, सौ. वगदाळे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0