सगरोळी येथील डॉ. माधव कटके, यांच्या परिवारातील तीन व्यक्तींचा देहदान. ( मारोती एडकेवार नांदेड/जिल्हा प्रतिनिधी नांदेड : ) सगरोळी येथील डॉ.माधव रामाजी कटके, संगीता माधव कटके,सविता लक्ष्मण कटके, कटके परिवारातील, तीनही व्यक्तीचा देहदान. करण्याचा निर्णय घेऊन समाजात सन्मानपूर्वक कार्य केले आहे. डॉ. माधव कटके हे मूळचे, गागलेगाव येथील रहिवासी असून, गेल्या वीस वर्षापासून सगरोळी येथे स्थायिक झाले आहेत, त्यांनी मातोश्री क्लिनिकच्या, माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करत असून, विविध सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. जगद्गुरु महात्मा बसेश्वर महाराज. यांच्या विचारांचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी, ते पाईक असून डॉ. संत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर,यांचे भक्त डॉ. माधव कटके, हे गेल्या वीस वर्षापासून,सामाजिक व आरोग्य सेवा, गोरगरीब जनता व समाजात देत आहेत. त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह,व शिवनाम सप्ताह च्या, माध्यमातून त्यांचं प्रबोधनात्मक भजन व प्रबोधन,कार्य चालूच आहे. मातोश्री क्लिनिकच्या माध्यमातून, त्यांनी सगरोळी सर्कल मधील,गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा देण्याचं कार्य करतात, व मातोश्री क्लिनिक च्या, माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर लावण्याचा त्यांचं कार्य चालूच आहे, माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर,माणूस हे माणसासाठी जगावं,माणूस म्हणून जन्म घेतल्यानंतर प्रत्येक माणसाला, समाजासाठी काहीतरी देणं लागतो.या उद्देशाने कटके परिवारांनी स्वतः डॉ. माधव कटके, व पत्नी संगीता माधव कटके, व सविता लक्ष्मण कटके,या तिघांचाही देहदान करण्याचं निर्णय घेऊन समाजात एक मोठे उच्च स्थान निर्माण केले आहे त्याबद्दल समाजातून व सर्व पत्रकाराकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

सगरोळी येथील डॉ. माधव कटके, यांच्या परिवारातील तीन व्यक्तींचा देहदान.                                                            
Previous Post Next Post