पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षा बंधन केला साजरा. (.शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी).सेलू : सेलू येथील सौ.सावित्री बाई बद्रीनारायणजी बिहानी नूतन प्राथमिक शाळा, सेलू प्रशालेत रक्षाबंधनानिमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी कब बुलबुल च्या मुलींनी अगोदर वृक्षांना राखी बांधली. तसेच पोलीस स्टेशन, सेलू येथे जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, पोलीस उपनिरीक्षक पठाण, कॉन्स्टेबल बोराडे आदि पोलीस बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक उल्हास पांडे व ज्येष्ठ शिक्षक एकनाथ जाधव यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रम प्रसंगी कब मास्टर धनंजय महामुनी व फ्लॉग लीडर सौ. कुंभार रामकोर, सौ. सोनाली कुबरे उपस्थित होते.

पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षा बंधन केला साजरा.              
Previous Post Next Post