त्र्यंबकेश्वर येथील पत्रकार हल्ल्याचा जनकल्याण मराठी पत्रकार संघ अकोला पत्रकारांतर्फे निषेध...! पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अकोला यांना दिले निवेदन* (अकोला जिल्हा विभागीय संपादक) दिनांक 20 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वत्र निदर्शने निवेदन दिले जात असून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अशी की,कुंभमेळ्याच्या नियोजन संदर्भात बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी योगेश खरे, किरण ताजणे , व अभिजित सोनवणे हे वृत्तांकनासाठी त्र्यंबकेश्वर येथे आले असता तेथील स्थानिक ठेकेदार व त्यांच्या साथिदार गुंडांनी त्यांना पार्किंग वरून वाद घालत अमानुष मारहाण केली. या मारहाणीत हे तिघेही जखमी झाले. त्यांना तात्काळ नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी जनकल्याण मराठी पत्रकार संघ अकोला जिल्हा कार्यकारणीच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवून पत्रकारांवर हल्ला करून त्यांना जबर मारहाण करणाऱ्या गुंडाना कठोर शिक्षा करण्याची मागणी असलेलं निवेदन अकोला पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांना देण्यात आले. यावेळी तुमच्या भावना वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहचवू असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले. यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष इमरान खान, चांद रिज़वी, गणेश वाडेकर, गुलाम मोहसिन, सैय्यद जमील, गजानन वानखड़े, संतोष मोरे, ज्ञानेश्वर निकाले, युसूफ शेख़, संतोष गवई, विजय देशमुख, इरफान शेख़, इरशाद शेख़. यांच्यासह आदी पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते
byमीडीया पोलीस टाईम
-
0