हाता येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरे फोडून ३ ते ४ लाखांचा ऐवज लंपास ... (विशेष अकोला जिल्हा ग्रामिण प्रतिनिधी) : दि : १७ जानेवारी २०२६ .हाता गावात अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच रात्री चार बंद घरे फोडून मोठ्या प्रमाणात चोरी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे ३ ते ४ लाख रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज आहे.प्राप्त माहितीनुसार, १६ व १७ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हाता गावातील रहिवासी भागातील चार घरे लक्ष्य केली. घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटे, पेट्या उचकून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेली. सकाळी घरमालकांना चोरीचा प्रकार लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच उरळ बु पोलीस ठाणे, जि. अकोला येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सतत वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमुळे हाता गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्री पोलीस गस्त वाढवावी तसेच चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.पोलीस प्रशासनाने लवकरच चोरट्यांचा छडा लावण्याचे आश्वासन दिले आहे.रिपोर्टर : मिडीया पोलीस टाइम्स न्युज हाता .

हाता येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरे फोडून ३ ते ४ लाखांचा ऐवज लंपास ...                                                                   
Previous Post Next Post