*महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हा अधिवेशन दिनांक 16 जानेवारी 2026 ला उत्साहात संपन्न*. कंत्राटदार विरहित रोजगार व समान काम समान वेतनाचे ठराव एकमताने मंजुर.@ मुरलीधर माजरीकर यांची वर्धा जिल्हाध्यक्षपदी निवड.महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांचे वर्धा जिल्हा अधिवेशन अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. अधिवेशनाची सुरूवात प्रतिमापूजन, श्रमिक गीत व "भारतीय मजदूर संघ जिंदाबाद" या जोशपूर्ण घोषणांनी करण्यात आली. सर्व मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक सादर करण्यात आले. या अधिवेशनास उद्घाटक स्थानी मा. श्री. शंकरराव पहाडे साहेब महामंत्री सेवा निवृत्त जेष्ठ नागरिक संघ महाराष्ट्र प्रदेश व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. श्री. निलेशजी खरात साहेब प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ हे लाभले. उपस्थित सर्व मान्यवरांनी कामगारांना मार्गदर्शन केले. अधिवेशनात संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. निलेशजी खरात यांनी मार्गदर्शन करतांना कंत्राटी कामगारांना नोकरीत स्थैर्य, कंत्राटदार विरहीत रोजगार व समान काम समान वेतन मिळावे यासाठी आग्रही असल्याचे स्पष्ट केले. या मागण्यांसाठी कायदेशीर लढा तसेच आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील कामगारांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले. अधिवेशनात जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या गंभीर समस्या, अडचणी व त्यावरील ठोस उपाययोजनांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. जिल्ह्यातील संघटनात्मक स्थिती, सदस्य नोंदणी व वर्गणी, सुरू असलेली न्यायालयीन प्रकरणे तसेच देणगी बाबत काटेकोर व पारदर्शक अंमलबजावणी करण्याचा ठाम निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन करतांना वीज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध संघटित व तीव्र लढा उभारण्याचे आवाहन केले. भारतीय मजदूर संघाच्या विचारधारेनुसार संघटन, संघर्ष व संवाद या मार्गाने कामगारांचे प्रश्न सोडविले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांसाठी चहा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या अधिवेशन प्रसंगी मुरलीधर माजरीकर, राहुल बोडसे, हेमंत वडे, प्रणव पोकळे, निलेश डवरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या अधिवेशनास 150 पेक्षा अधिक कंत्राटी वीज कामगारांची लक्षणीय उपस्थिती होती.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हा अधिवेशन दिनांक 16 जानेवारी 2026 ला उत्साहात संपन्न*.                         
Previous Post Next Post