खुर्सापार जंगल येथे आणखी एका वाघाला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात प्रशासनास मोठे यश मिळाले असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आज वन अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे व प्रशासनाच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वी ठरली आणि वाघाला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.नागरिकांच्या सुरक्षिततेचा व वाघाच्या नैसर्गिक अधिवासाचा विचार करून, सदर वाघाला पेंच व्याघ्र प्रकल्प येथे नेऊन सोडण्यात आले.काही दिवसांपूर्वी नागपूर येथे अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्याचे माननीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या समवेत या गंभीर विषयावर सविस्तर बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत वन विभागाला आवश्यक ते ठोस निर्देश देण्यात आले होते. आज त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरु आहे २ दिवसाअगोदर एका वाघाला व आज एका वाघाला पकडून प्रत्यक्षात उतरली आहे.तसेच परिसरात असलेल्या उर्वरित वाघांबाबतही नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांना लवकरात लवकर पकडण्याचे स्पष्ट आदेश आज संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. वन विभाग, प्रशासन व स्थानिक यंत्रणांच्या सतर्कतेमुळे ही महत्त्वपूर्ण कारवाई शक्य झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.हिंगणघाट विधान सभा चे आमदार कार्यसम्राट समीर कुन्नावार साहेब, यांच्या प्रयत्नला यश मिळालेला आहे.उमेश तुडसकर,किशोर दिघे स्वीकृत नगरसेवक हि न पा,वन विभाग चे अधिकारी व गावकरी उपस्थित होते..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलीस टाईम विभागीय उपसंपादक
byमीडीया पोलीस टाईम
-
0