समुद्रपूरच्या दुर्गा मंदिरात नवरात्रोत्सव, राष्ट्रवादी नेत्यांनी 225 अखंड ज्योत प्रज्वलित केल्या . (प्रतिनिधी. पुरुषत्तम फुलझेले.*) आज समुद्रपूर येथील दुर्गा माता देवस्थानात नवरात्रोत्सवाचा पावन कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी घट पूजन करून 225 अखंड ज्योतांची स्थापना केली. यावेळी समुद्रपूर शहराध्यक्ष मधुकर कामडी, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार सुधीरजी खडसे, माजी नगरसेवक राजू भाईमारे, युवक शहराध्यक्ष अतुल चौधरी यांसह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या आणि समाजात एकात्मतेचा संदेश दिला. अशी पारंपरिक सोहळे समाजाला एकत्र आणतात, नवरात्रीच्या उत्सवाला नवीन उधाण देतात.

समुद्रपूरच्या दुर्गा मंदिरात नवरात्रोत्सव, राष्ट्रवादी नेत्यांनी 225 अखंड ज्योत प्रज्वलित केल्या .                               
Previous Post Next Post