राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांची डोलारा वार्डातील नाल्या साफ सफाई करण्याची मागणी.. भद्रावती नगरपरिषद ला निवेदन देण्यात आले. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती भद्रावती ) दि.१३:- शहरातील प्रभाग क्रमांक ५ असलेल्या डोलारा वार्डातील सुरज पान सेंटर ते ठाकुर यांच्या घरपरीसरादरम्यान केरकचऱ्यामुळे नाल्या तुंबल्याने नाल्यांमधील घाण पाणी ओसंडून ते रस्त्यावरुन वाहात आहे.यामुळे परीसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असुन याचा विपरीत परिणाम परीसरातील नागरीकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हि गंभीर समस्या लक्षात घेऊन या परीसरातील नाल्यांची सफाई करुन येथे नेहमी स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नगरपरीषद कार्यालयात सादर करण्यात आलेल्या एका निवेदनातून करण्यात आली आहे. केरकचऱ्यामुळे येथील नाल्या तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर येऊन परीसरात दुर्गंधी पसरली आहे.घाण पाणी रस्त्यावर साचुन असल्याने येथील नागरीकांना व शाळेकरी मुलांना या घाण पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. याचा त्रास येथील नागरीकांना सोसावा लागत आहे.या घाणीमुळे हा परीसरही बकाल झाला आहे. या दुर्गंधीमुळे नागरीकांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या भागातील नाल्यांची त्वरीत साफसफाई करुन येथील नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार,सुरज मेश्रम, शुभम गजभिये, एजाज पठाण, वैभव गजभिये, साफिन पठाण, आदी उपस्थीत होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांची डोलारा वार्डातील नाल्या साफ सफाई करण्याची मागणी..                                                                                         भद्रावती नगरपरिषद ला निवेदन देण्यात आले.                
Previous Post Next Post