कत्तलीसाठी वाहतूक होत असलेल्या सात गाय व गोवंशाची सुटका... दिनांक 23 सप्टेंबर 2025, रोजी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास मालेगाव येथील गोरक्षकांच्या मदतीने वडनेर खाकुर्डी पोलिसांनी एम एच 18 ए ए 6217 या बोलेरो पिकअप वाहनातून कत्तलीसाठी वाहतूक होत असलेल्या सात गाय गोवंशाची वडगाव गावाजवळ सुटका केली आहे.यासंदर्भात गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांना गोपनीय माहिती मिळाली की, कुसुंबा गावाकडून मालेगावच्या दिशेने कत्तलीसाठी गाईंची एका बोलेरो पिकअप वाहनातून वाहतूक केली जाणार आहे. सदर वाहन कुसुंबा रोडवर, वडगाव ग्रामपंचायतच्या समोर थांबवल्यानंतर गोरक्षक व पोलिसांना असे निदर्शनास आले की, बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच 18 ए ए 6217 यामध्ये सात गायींची दोरीने निर्दयतेने पाय तोंड घट्ट बांधून, एकमेकांना इजा उत्पन्न होईल अशा पद्धतीने, कुठल्याही खरेदीची पावती व जनावरांच्या वाहतुकीचा परवाना नसताना कत्तलीसाठी उद्देशाने बेकायदेशीरपणे वाहतूक करत आहे. यावेळी वाहन चालक व त्याचा साथीदार पळून जात असताना शेख युसुफ शेख भिकनला स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर माहितीची मच्छिंद्र शिर्के, विनोद निकम, प्रभाकर देसले, पंकज अहिरे, महेंद्र अहिरे व वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे सपोनी शिरसाट सो, पोहवा पाटील, पोना बाचकर, पोअं सोमवंशी यांना खात्री झाली.सदर घटनेची माहिती मच्छिंद्र शिर्के यांनी तात्काळ मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीरसिंग संधू सो व नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सो यांना दिल्यानंतर वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सदर सर्व गाई श्री गोशाळा पांजरापोळ संस्था, शाखा दाभाडी येथे पालन पोषणासाठी पाठवले. सदर घटनेबाबत शेख युसुफ शेख बिकन रा. पवारवाडी, आवेश, मुस्तकीन ,जमीर उर्फ समीर (नाव पत्ता माहीत नाही) या चार आरोपी विरोधात महाराष्ट्र शासन नियुक्त मानद प्राणी कल्याण अधिकारी विनोद काळु निकम, रा. वडगाव यांच्या फिर्याद क्रमांक 412/2025 प्रमाणे प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1) (d), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 A (1), 5(b), 9, 9 A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 64,000 रु किमतीची जनावरे व 1,20,000 रु किमतीचे वाहन असा एकूण अंदाजे 1,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विश्वास पाटील करत आहे.

कत्तलीसाठी वाहतूक होत असलेल्या सात गाय व गोवंशाची सुटका...                                                                  
Previous Post Next Post