*जिल्हास्तरीय ॠतूरंग चित्रकला स्पर्धेत नितिन विद्यालयाची ऊतूंग भरारी. ( मानवत *बातमीदार / अनिल चव्हाण}———————————महाराष्ट्र राज्य *कलाध्यापक संघ* महामंडळ पुणे आयोजित जिल्हास्तरीय ऋतुरंग चित्रकला स्पर्धेत नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेर बोरगाव शाळेचे यश शालेय स्तरावर विद्यालयातील कु. शिवकन्या कैलास मोगरे प्रथम, कु. सायली गंगाधर भोसले द्वितीय, कु. निकिता संजय बिल्हारे तृतीय व तेजश्री कैलास लिपणे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. तसेच विद्यालयातील कलाध्यापक श्री संतोष ताल्डे सरांना ऋतुरंग कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे.चे राज्य सरचिटणीस मा. श्री दिगंबर बेंडाळे सर, जिल्हाध्यक्ष केशव लगड सर जिल्हा सचिव अतुल सामाले सर आदी मान्यवरांचा हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र काका लहाने, मुख्याध्यापक श्री सर्जेराव लहाने सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कलाशिक्षक संतोष ताल्डे सर व विद्यार्थ्यांचे कौतुक केले...रविवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशाला,परभणी. या ठिकाणी ऋतुरंग चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या दरम्यान कलाशिक्षक श्री संतोष ताल्डे यांच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा वर आधारित चित्रांचे भव्य चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. चित्र प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद होता.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0