बडूर येथील मातंग समाजाचा बिलोली, तहसील कार्यालयावर आमरण उपोषण. (मारोती एडकेवार जिल्हा/ प्रतिनिधी नांदेड )नांदेड: बिलोली तालुक्यातील बडूर गावात क्रांतीसुर्य साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्यासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याच्या विरोधात,बडूर येथील मातंग समाजाचा तिर्व संताप व्यक्त होत आहे,केवळबाई गंगाराम दावलेकर या महिलेने सदर अतिक्रमण केलेला आहे, असे मातंग समाजाकडून आरोप होतं आहे सदर महिलेला अनेक वेळा अतिक्रमण काढून घ्यावे अशी विनंती केली असता,समाज बांधवांना घाण शब्द भाषा वापरत, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र राबवली आहे, व गावातील काही जातीयवादी उच्चवर्णी लोक या महिलेला साथ देण्याचे कार्य सुरू करत असल्याची,माहिती उपोषणकर्ते यांनी दिलेली आहे डॉ. आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे, नियोजित जागा काबीज करून स्वतः त्या ठिकाणी, घर बांधण्याचे बांधकाम सुरुवात केली आहे यामुळे, गावातील वातावरण अधिक तणावपूर्ण आहे सदर महिलेची वर्तणूक आणि आक्रमक भूमिका पाहता अतिक्रमणाच्या,विरोधात असलेल्या गावातील बहुसंख्य मातंग समाज पुरुष व महिलांनी एकत्र येत, आंदोलनाचा निर्णय घेतला अखेर 22 जानेवारी रोजी मा.जिल्हाधिकारी नांदेड, मा उपाधिकारी साहेब,अधिकारी बिलोली तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी,तसेच पोलीस निरीक्षक बिलोली, यांना निवेदन देत संबधीत महिलेवर तात्काळ करावी,यासाठी तहसील बिलोली कार्यावर आमरण उपोषण करण्यात येत आहे,उपोषण कर्ते, पिराजी लालबा दावलेकर, राम जळबा भंडारे, गंगाराम माणिक दावलेकर, चंदु गोविंद सोमवारे, मारोती गोविंदराव जाधव, मागण्या, डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जागेवरती केलेली अतिक्रमण हटवण्यात यावे, अनाधिकृत जागेवरील विनापरवाना करीत असलेले बांधकाम थांबविणे, अवैधरीत्या चोरून मुरूम आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावा, सदर महिला गावाचे शांतता व एक्यता धोक्यात असल्या प्रकरणी तात्काळ प्रतिबंधक करावा, स्वतः 420 असून या विरोधात लढणाऱ्या पुरुषावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी धमकी देत असल्याने तिच्यावर तात्काळ कारवाई करावी, या प्रकरणात सदर महिलेवर तात्काळ कारवाई करून मातंग समाजाला न्याय मिळवून द्यावा याबाबतीत प्रशासनाने, गांभीर्यपूर्वक दखल घेऊन त्या महिलेवर ती कारवाई करावी,अन्यथा मातंग समाज पूर्ण महाराष्ट्र मध्ये रस्तावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे मातंग समाजामधून त्रिव व संताप व्यक्त करण्यात येत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0