*मानवत रोड उड्डानपूलावरील सामाजीक बांधिलकी म्हणून खड्डा बूजविला**राष्ट्रीय महामार्ग प्रशासन बे खबर*. (मानवत विभागीय संपादक } अनिल चव्हाण )*————————*मानवत तालूक्यातून राष्ट्रीय महामार्ग ६१ गेला असून गेल्या अनेक वर्षापासून या महा मार्गाकडे महामार्ग प्रशासनाचे दूलर्क्ष होत असल्यामूळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. मात्र याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ मिळत नसल्यानेच या राष्ट्रिय महामार्ग ६१ वरील कोल्हा येथील उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. ही समस्या लक्षात घेऊन मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पंकज भैय्या आंबेगावकर यांनी आज खड्डे बुजवून विधायक कार्य केले. या विधायक व सामाजीक कार्य करून सहकार्य केल्याबद्दल कोल्हा गावकऱ्यांच्या वतीने सभापती पंकज आंबेगावकर यांचे नागरीकांनी यावेळी आभार मानले. *
byमीडीया पोलीस टाईम
-
0