चोपडा नगरपालिका सभापतींची निवड बिनविरोध.. (चोपडा दि.१९( संजीव शिरसाठ)चोपडा नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांची सभापती पदांची निवड पीठासन अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच होऊन स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष सौ नम्रता सचिन पाटील यांची तर बांधकाम समिती सभापती पदी हुसेन खाँ अय्युब खॉं पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तसेच इतर समिती सभापतींची ही निवड घोषित करण्यात आली आहे. नगरपालिका सभागृहात सकाळी 11 वाजता पीठासन अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब राऊत यांच्या कडे स्थायी व विशेष समिती सभापतींचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रत्येकी एकच आल्याने बिनविरोध स्थायी समिती सभापतीपदी सौ नम्रता ताई सचिन पाटील तर बांधकाम सभापतीपदी हुसेन खाँ अय्युब खॉं पठाण, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती पदी अमोल साहेबराव पाटील, स्वच्छता वैद्यक आणि आरोग्य समिती सभापतीपदी रमेश ग्यानोबा शिंदे, पाणीपुरवठा व जल निस्सारण समिती सभापतीपदी किशोर रघुनाथ चौधरी, नियोजन व विकास समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष पंकज सुरेश बोरोले आणि महिला व बालकल्याण समिती सभापती पदी सौ. देवयानी पवन माळी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी सौ नम्रता सचिन पाटील उपाध्यक्ष पंकज सुरेश बोरोले गटनेता योगेश उर्फ पियुष राजेंद्र चौधरी,गटनेते रमाकांत नथू ठाकूर,गटनेते गजेंद्र अरविंद जैस्वाल,गटनेते हितेंद्र रमेश देशमुख यांच्यासह 34 सदस्य हजर होते. तसेच मुख्याधिकारी रामनिवास झवंर, उप मुख्याधिकारी संजय मिसर, सभा अधीक्षक संजय ढमाळ, अनिल चौधरी तसेच सर्व विभाग प्रमुख व नगरसेवक मोठ्या संख्येने हजर होते.

चोपडा नगरपालिका सभापतींची निवड बिनविरोध..                      
Previous Post Next Post