स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरेश्वर येथे उत्साहात पार पडला.मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांच्या मार्गदर्शना खाली. (पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील ग्रामीण रुग्णालयात दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान घेण्यात आला. या अभियान चे आयोजन वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तेली यांनी केले .अभियान मध्ये डॉ स्वप्नील पाटील (MD MEDICINE संचालक सिद्धिविनायक हॉस्पीटल पाचोरा ), डॉ राहुल निकम (बालरोग तज्ञ), डॉ दिव्या सोळुंके (स्त्रीरोग तज्ञ), नितीन कुमार गेडाम (दंतचिकित्सक), डॉ पंकज नानकर (आयुर्वेदिक ), डॉ दौलत निमसे (मानसोपचारतज्ज्ञ ), डॉ निकिता हजारे (नेत्रचिकित्सक)व ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरेश्वर येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी सिद्धिविनायक हॉस्पीटल पाचोरा यांचा समावेश महत्वाचा ठरला.गावातील प्रतिष्ठित पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच लाभार्थी उपस्थित होते. या अभियान मध्ये क्षयरोग, एच. आय. व्ही. तपासणी, बी.पी. ,शुगर, रक्त तपासणी, ECG,हिवताप जनजागरण मोहीम व प्रदर्शन तसेच डेंगू चिकनगुनिया हिवताप व साथीचेरोग संदर्भात माहिती व तपासणी करण्यात आली सदर कार्यक्रमास ICTC समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी सदर शिबिरात मार्गदर्शन केले व आयसीटीसी वाटप करण्यात आली.

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरेश्वर येथे उत्साहात पार पडला.मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांच्या मार्गदर्शना खाली.                                     
Previous Post Next Post