*ईद ए मिलाद निमित्त धर्माबाद शहरात शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन**********दिनांक 3 सप्टेंबर (धर्माबाद तालुका प्रतिनिधी (गजानन वाघमारे) ईद ए मिलादूउन नबी निमित्त धर्माबाद शहरात समस्त मुस्लिम समाजाकडून ५ सप्टेंबर शुक्रवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.पैगंबर च्या १५०० वर्ष जयंती निमित्त पैगंबर हे सर्वासाठी असून यांच्या जयंतीचे अोचित्त साधून शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.धर्माबाद शहरात समस्त मुस्लिम समाजाकडून पहिल्यांदाच भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येत असून,तरीही सकाळी ९:०० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तादान शिबिर घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.या रक्तदान शिबिराला जास्तीजास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजकांकडून केलं आहे. नाव नोंदणी साठी सामजिक कार्यकर्ता नविद अहमद, सय्यद इलियास (पत्रकार) , मोहम्मद खान, मिन्हाज पटेल,इज्जू भाई,मुबशीर (पत्रकार), शैख़ कलीम , सुलतान यांना संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.
byमीडीया पोलीस टाईम LIVE
-
0

