मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन..... (संजय भरदुक विशेष जिल्हा प्रतिनिधी वाशिम ) ____________________________वाशिम--वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात १९ सप्टेंबर २०२५ रोजी निवेदन देण्यात आले.मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे.मुख्यमंत्री यांनी २० में २०२५ रोजी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून मुंबई येथे आझाद मैदान येथील कार्यक्रमात मातंग समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी.आणि डॉ.अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा.तसेच साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक वाशिम मध्ये उभारावे तसेच मातंग समाजाची वाशिम येथील मयत स्वर्गीय श्रेता पडघाने या महिलेच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा आणि नांदेड येथे आंतरजातीय प्रेमप्रकरणातून मातंग समाजातील युवकाचे हत्याकांड झाल्याने या प्रकरणातील दोषी तरूण आणि तरूणीच्या मॄत्यू जबाबदार असणाऱ्या आरोपींना उचित कार्यवाही करून तात्काळ फाशी देण्यात यावी यावर या सर्व मागण्यासाठी वाशिम येथे १९ सप्टेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व मातंग समाज बांधव व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0