**पोलिसांच्या कर्तव्यात माझी वसुंधरा यासाठी एक पाऊल पूढे*. (मानवत बातमीदार } अनिल चव्हाण. ) {९५२७३०३५५९-}परभणी जिल्ह्यातील पाथरी पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहती मध्ये रविवारी विशेष वृक्षलागवड ( माझी वसूंधरा ) उपक्रम राबविण्यात आला.सविस्तर वृत्त असे की, परभणी जिल्हाचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक मा. रविंद्रसिंह परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाले जिल्हातील विविध पोलिस ठाणे व वसाहत परिसर या भागात माझी वसूंधरा या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षलावगड हा उपक्रम घेण्यात आला. पाथरी पोस्टे वसाहती मध्ये तब्बल विविध जातीच्या *३००* तीनशे वृक्षांची लागवड करून पोलिस प्रशासनांनी माझी वसुंधरा पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला.यावेळी माझी वसुंधरा हरित वसुंधरा या उपक्रमाचे नेतृत्व पाथरी पो.स्टेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी केले. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, अधिकारी व स्थानिकांनी उत्साहाने सहभाग घेतला वसाहतीत लावण्यात आलेल्या विविध प्रकारच्या वृक्षांमुळे परिसर हरितमय होणार असून, भावी पिढ्यांसाठी शुद्ध हवा व निरोगी वातावरणाची हमी मिळणार आहे.पोलिसांचे मुख्य कर्तव्य म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखणे. मात्र, समाज रक्षणा बरोबर पर्यावरण रक्षणात ही आपली जबाबदारी आहे.पाथरी पोलिसांनी हरित वसुंधरा या उपक्रमातून दाखवून दिले. "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत पोलिसांच्या कर्तव्यात हरित क्रांतीचा सुगंध दरवळत ठेवला आहे.मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या या वृक्षलावगडीमुळे शहरातील नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, पोलिस प्रशासनाकडून हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0