जांब येथे जय अंबे दुर्गोत्सव मंडळ घटस्थापनेला ४१ वर्षे पूर्ण ________________________________________________________________________________. (संजय भरदुक विशेष जिल्हा प्रतिनिधी वाशिम )_____________________________________________२२ सप्टेंबर २०२५ ________________________________मंगरुळपीर ---मंगरूळपीर तालुक्यातील जांब गावात जय अंबे दुर्गोत्सव मंडळाची सन १९८४ या वर्षी स्थापना करण्यात आली होती.गावातील प्रतिष्ठीत नागरिक श्री स्व . पांडूरंग पाटील अव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तुकाराम ऊर्फ बबनराव भरदुक सेवा निवृत्त तलाठी व स्व.जयराम आकोटकर ( मिस्त्री) , यांनी आणि गावातील इतर सहकारी नागरिक सदस्यांनी व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जांब गावामध्ये जय अंबे दुर्गोत्सव मंडळाची स्थापना करून १९८४ मध्ये सुरूवात केली असता आज पर्यंत सन २०२५ यावर्षी ४१ वर्षे पूर्ण होत दरवर्षी प्रमाणे दुर्गोत्सव घटस्थापना होत कार्यरत चालू आहे.दरवर्षी प्रमाणे नवरात्रात नऊ दिवस गावात आनंदात व उत्साहात गावातील सर्व गावकरी पुरुष मंडळी व महिला मंडळ आणि लहान मुले एकत्रितपणे सहभाग घेऊन देवीची रोज सकाळी व संध्याकाळी देवीचे पूजन करून आरती केली जाते. नऊ दिवस गावात मध्ये एकत्रितपणे भक्तीमय वातावरण निर्माण होवून दहा दिवस दुर्गोत्सव मंडळ आनंदोत्सव साजरा करतात . आणि तसेच झोलेनाथ भजनी मंडळ जांब यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो तसेच इतरही भक्तीमय कार्यक्रम आयोजित केले जातात.आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते आणि गावातील सर्व भाविक भक्त प्रसादाचा लाभ घेतात आणि शांततापूर्ण मार्गाने भक्तीमय वातावरणात देवीची गावामध्ये मिरवणूक काढून विसर्जन केल्या जाते.आणि गावातील श्री तुळशीराम अव्हाळे, महादेव भरदुक, बंडू पाटील अव्हाळे, घनश्याम अव्हाळे, दिलिप अव्हाळे, अनिल भरदुक, हिम्मत मोहटे, चंद्रकांत अव्हाळे, धर्मराज अव्हाळे, सागर अव्हाळे, अक्षय भरदुक, विठ्ठल भरदुक, नवल अव्हाळे, केशव खिल्लारे, रविंद्र काळे, निलेश अव्हाळे, विशाल अव्हाळे, जय अंबे दुर्गोत्सव मंडळ जांब सर्व विश्वस्त मंडळ व समस्त भाविक भक्त व गावकरी मंडळी तनमनधनाने नवरात्र उत्सवात सहभागी होतात.
byमीडीया पोलीस टाईम
-
0