श्री जगदंबा देवी डोंगरखेड येथे नवरात्रोत्सव सोहळा प्रारंभ __. (संजय भरदुक विशेष जिल्हा प्रतिनिधी वाशिम ) _मंगरूळपीर---दिंनाक २२/०९/२०२५ सोमवार घटस्थापना ते ०२/१०/२०२५ दसरा गुरूवार पर्यंत नवरात्रोत्सव महोत्सव साजरा केल्या जातो.दररोज सकाळी ५.३० वाजता काकडा आरती ,आणि सकाळी ७.१५ मिनिटांनी आरती ,नंतर सायंकाळी ५.३० मिनिटांनी हरिपाठ ,नंतर सायंकाळी ७.०० वाजता आरती, करण्यात येईल तसेच इतरही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहेत,२३/०९/२०२५ मंगळवारी दुपारी वेळ ३ ते ५ पर्यंत जय गजानन महिला भजनी मंडळ मोहरी, २४/०९/२०२५ बुधवार ला दुपारी ३ ते ५ पर्यंत जय गजानन महिला भजनी मंडळ बेलखेड ,२५/०९/२०२५ गुरूवार ला वेळ ३ ते ५ पर्यंत जिजाऊ महिला भजनी मंडळ मंगरूळनाथ,२६/०९/२०२५ शुक्रवार ला वेळ रात्री ८ वाजता देवीचा गोंधळ श्रीकृष्णजी मॄदगल,व संच मुर्तिजापूर,२७/०९/२०२५ शनिवार ला वेळ ३ ते ५ पर्यंत संत झोलेनाथ महिला भजनी मंडळ मंगरूळनाथ,२९/०९/२०२५ सोमवार ला वेळ ३ ते ५ पर्यंत रूक्मिणीमाता एकतारी भजनी मंडळ खडी यांचा कार्यक्रम राहील.३०/०९/२०२५ मंगळवार ला वेळ सकाळी ६ वाजता होमहवन राहील.आणि ०१/१०/२०२५ बुधवार सकाळी ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी महाप्रसादाचे पूजन व वितरण श्री. मा.आमदार श्यामभाऊ खोडे वाशिम, मंगरूळनाथ मतदार संघ, श्री मा.महंत धर्मगुरू आमदार बाबुसिंगजी महाराज विधानपरिषद, मा.आमदार श्रीमती सईताई डहाके कारंजा मानोरा मतदार संघ,मा.श्री लखनजी मलीक माजी आमदार,मा.श्री.अमोलजी पाटणकर साहेब उपसचिव मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई.या मान्यवरांच्या उपस्थितीत शुभहस्ते करण्यात येईल तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
byमीडीया पोलीस टाईम
-
0