समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. (वर्धा प्रतिनिधी.गिरड. अब्दुल कदीर) समुद्रपूर तालुक्यातील मौजा सावरखेडा मुसळधार पावसामुळे शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभी असलेली कापूस आणि सोयाबीन पिके मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे तालुक्यातील मुसळधार पावसामुळे नद्या व नाले पाण्याने भरून वाहत असून शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान झाले आहे पुराने उभी असलेली पिके वाहून गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे समुद्रपूर तालुका सर्कल ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे नुकसान गंभीर असल्याने जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि आमदार यांना लेखी निवेदनाद्वारे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सततच्या पावसामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले असून तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे.

समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.                                                                              
Previous Post Next Post