त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा शहादा तालुका पत्रकार संघाकडून निषेध.. (प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी ) शहादा : त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या निषेधार्थ शहादा तालुका पत्रकार संघाने पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर करून आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.ही घटना स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंग परिसरात घडली. ‘झी २४ तास’ चे ब्युरो चीफ योगेश खरे, ‘साम टीव्ही’ चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि ‘पुढारी न्यूज’ चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर पार्किंग कर्मचाऱ्यांनी दगड, लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला.पत्रकार संघाने या घटनेचा तीव्र निषेध करताना म्हटले आहे की, पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला असून ते निंदनीय आहे. समाजहितासाठी आणि सत्यासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडू नयेत याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी शहादा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. नेत्रदीपक कुवर, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र अग्रवाल, प्रा. डी.सी. पाटील, जगदीश जयस्वाल, चंद्रकांत शिवदे, प्रा. अब्रार खान, योगेश सावंत, हर्षल साळुंखे, दीपक वाघ, सलाउद्दीन लोहार यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. त्यांनी पोलिस निरीक्षक निलेश दिसले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा शहादा तालुका पत्रकार संघाकडून निषेध..                                     
Previous Post Next Post